प्रतिनिधी .अमोल साखरे
दिनांक ३.०६.२०१८
आष्टी परिसरातील अनेक ठिकाणी सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाट,वादळासह पाऊसला सुरवात झाली. या वादळामध्ये अनेक झाडे कोसळली,अनेकांचे घरावरील पञे वादळाने उडुन गेली. ठीक ठिकाणी विद्युत खांब कोसळले. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या वादळात शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. खिळद गावातील जि.प. शाळा येथील प्रवेश कमान कोसळी. त्याच प्रमाणे गावातील हाॅटेलची पञे उडाली. गावातील एका दुकानावरती झाड कोसळुन दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.



















