बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०५.२०२२
आष्टी- टाकळसिंग ते हनुमंतगाव रस्ता मागील कित्येक दिवसांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असून या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे अनेकजन जायबंदी झाले असून दुचाकी व चारचाकी वाहनांचा मात्र खुळखुळा झाला आहे. या रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात झाले असून कित्येकांना दुखापत तर एकाला जिव गमवावा लागला आहे. या बाबत रहिवास्यानी वारंवार तक्रार करूनही या बाबत लोकप्रतिनिधी व संबंधीत अधिकारी अजिबात दखल घेत नाहीत. या रस्त्याची १९७२ पासून कसलीही दुरूस्ती, डागडुजी झालेली नाही परंतू या रस्त्याची दुरूस्ती दोन वेळा कागदावर झाल्याची परिसरात चर्चा आहे.येत्या काळात रस्ता न झाल्यास रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती जनतेतून समोर येत आहे.



















