निर्भिड पत्रकार
आष्टी,प्रतिनिधी
कडा शहर येथे निर्भिड पत्रकार टीम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला निर्भिड पत्रकार टीमला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष दीपक (भैया ) गरुड यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सुरवात केली. दि,२६/०६/२०१८ रोजी कडा शहरात येथे सुरु झालेला निर्भिड पत्रकार वृत्तपत्रास चांगला प्रतिसाद मिळत असून वाचकांचे, सर्वसमान्यचे व सामाजिक कार्यकर्ता यांचे लक्ष वेधुन घेत आहे. या बैठकीस निर्भिड पत्रकार आष्टी तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल जाधव, सतीश गरुड,अमोल पवार, प्रशांत जाधव, अमोल साखरे, सचिन जाधव,अभिषेक भोजने, प्रतीक जाधव हे उपस्थित होते.



















