सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.१८.०६.१९
करमाळा- कुर्डवाडी येथील ट्रामा केअर सेंटर इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावावर आ. नारायण आबा पाटील यांनी सांगीतले कुर्डवाडी ता.माढा येथील ट्रामा केअर सेंटर इमारत बांधकामाच्या प्रस्तावास मा.ना.एकनाथजी शिंदे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री.यांनी मान्यता दिली आहे. सदर कामास ७३३.७३ लक्ष इतक्या निधीची गरज असुन सध्या प्रशासकिय मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत. या भागात अपघात घडल्यास अपघात ग्रस्त व्यक्तीवर तातडीने उपचाराची व्यवस्था उपलब्ध नव्हती परंतु या भागातील नागरिकांनी आपल्या जवळ या कामासाठी आग्रह धरला.त्यानंतर गेल्या तिन वर्ष या ट्रामा सेंटरच्या मान्यतेसाठी सतत पाठपुरावा करत होतो. अखेर आज प्रशासकीय मान्यता मिळाल्याने एक महत्वाची पायरी आता पार पडली आहे. पुढील कामास गती येणार आहे.करमाळा मतदार संघातील कुर्डवाडीसह ३६ गावाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे या वेळी आ. नारायण आबा पाटील यांनी सांगीतले.



















