सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांचा पाटण तालुक्याच्या विकासासाठी
शासन दरबारी असणारी तळमळ यामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला खरी गती मिळाली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकूळे यांनी व्यक्त केले २०१८_१९ चे अर्थ संकल्पातून मंजूर झालेल्या नाडे नवा रस्ता ते मरळी या रस्त्याच्या भूमि पूजना समारंभावेळी ते बोलत होते.
नाडे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य विजय पवार(नाना)यांनी केले प्रास्ताविक करताना त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निधनानंतर पाटण तालुक्याचा अपूर्ण राहिलेला विकास आज आ.शंभूराजे देसाई याच्यामूळे मार्गी लागला आहे असे सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात आ.शंभूराजे देसाई यांनी पाटण तालुका हा दुर्गम तालुका असून या तालुक्यात १५०० पवनचक्या झाल्या पण रस्ते मात्र तसेच राहिले २००४ साली मी आमदार असताना विधान सभेत भूमिका मांडली काही कामे पूर्ण केली पण २०१४ पासून कामाला गती मिळाली. माजी मंत्री अजित पवार म्हणाले की १२-१२ला म्हणजे शरद पवार साहेबाच्या वाढदिवसाला संपूर्ण महाराष्ट्र ऊर्जा मुक्त होइल पण आज अखेर झाला नाही पण आजचे ऊर्जा मंत्री वेगाने काम करत आहेत असे सांगताना पाटण तालुक्याचा विकासासाठी डोंगरी विकास आराखडा तयार करणे व मान्यता देणे इरिगेशन योजनासाठी निधी कोयना प्रकल्पालातील मूलांना कंत्राटी कामगार न ठेवता कायम करणे अशा अनेक मागण्या आमदार देसाई यांनी आपल्या भाषणात मांडताना लोकांच्यात मिसळणारे मंत्री लोकहिताचे निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्याचा तालुक्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
ना.चंद्रशेखर बावनकूळे यांनी आपल्या भाषणात विधानभवनातील उत्कृष्ट वकील शंभूराजे आहेत.पाटण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्यातील जनतेची विशेष वकीली करणारे आ.शंभूराजे आहेत तसेच २८८ आमदारात पहिल्या दहा मध्ये शंभूराजे येतात असे सांगत आ.शंभूराजे यांनी मागितलेल्या सर्व मागण्या मान्य करून परत यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा असे सांगितले.
या काय॔क्रमाला विजय पवार मा. रविराजे देसाई, मिलिंद पाटील, जयवंत शेलार, सूग्रा खोंदू, सिमा मोरे तसेच प.स. सदस्य लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना सर्व संचालक पदाधिकारी विविध गावचे सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प.स.सदस्य संतोष गिरी यांनी मानले.



















