ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.१०.२०२२
मुंबई- १९८५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळी “धगधगती मशाल” हे चिन्ह घेतले होते. या मशाल चिन्हावर शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ताही आली होती. त्यामुळे हे मशाल चिन्ह येणाऱ्या महापालिका आणि विधानसभा निवडणूकीत यशाचा मार्ग दाखवणारे ठरेल.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह जारी केले असून “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात आणि मुंबईत शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष करीत पेटत्या मशाली हातात घेऊन नाचवत, वाजत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली, तर शिवसेनेच्या जिवावर निवडूण आलेल्या गद्दारांनी शिवसेना फोडून भाजपाचे तऴवे चाटणाऱ्या काही अधंकार या राज्यात पसरवला आहे तो अंधकार दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला ही धगधगती मशाल हे चिन्ह मिळाले, अशी जोरदार टीका शिंदे गटावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी करत हातात मशाली घेऊन जल्लोष केला.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले असून शिवसेना आणि मशाल या चिन्हाचे जुनेच नात आहे. या चिन्हानेच शिवसेनला सत्तेची आणि विजयाची वाट दाखवली होती. या चिन्हानेच मुंबई महापालिकेत आणि विधानसभेत पहिल्यांदा शिवसेनेला सत्तेची वाट दाखवली होती.
१९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना आधी नोंदणीकृत पक्ष नव्हता. यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची नोंद ही अपक्ष म्हणूनच होत असे. १९६८ मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल – तलवार या चिन्हावर लढवली होती. १९८० च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर १९८५ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, बॅट-बॉल अशी वेगवेगळी चिन्हे मिळाली होती.
१९८९ मध्ये निवडणूक आयोगाकडे बाळासाहे ठाकरे यांच्या शिवसेनेची नोंद झाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. गेली ३३ वर्षे शिवसेना हे चिन्ह अभिमानाने मिरवत होती. ते आता शिंदे गद्दाराच्या मानेवर तलवार ठेऊन भाजपाच्या कटकारथानाने आता गोठविण्यात आले आहे. १९८५ साली शिवसेना मशाल या चिन्हावर ७४ नगरसेवक निवडून आले होते. तेच जूने मशाल चिन्ह शिवसेनेला मिळाले आहे. या मशाल चिन्हाव उद्धव ठाकरे यांची शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीला समोरे जाणार आहे. या निवडणूकीत विजय मिळून उद्धव ठाकरे हे इतिहासाची पुनरावृती करतात का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.



















