रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०८.२०२२
उरण- रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उरण संस्कार विभाग वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर जासई बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. अमोल शेजवळ होते तर सूत्रसंचालन आयु. नवनीत कांबळे सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा रायगडच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक आयु. अनिल मनोहर व आयु. सुनंदाताई पवार (केंद्रीय प्रशिक्षण सचिव) यांनी भारतीय बौद्ध महासभेची उद्दिष्टे, कार्य व कार्यकर्त्याची आचारसंहिता यांचे मार्गदर्शन केले. यावेळी शेकडो च्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयु. विजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयु. विजय कांबळे, आयु. राजेश भालेराव, आयु. गणेश कांबळे इत्यादी उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा ओरडचे पदाधिकारी विजय मस्के, प्रकाश कांबळे राजेश कांबळे, भागवत भूताळे सदानंद सकपाळ यश कांबळे, कमलेश चौधरी, शरद तायडे, सुनील जोशी, भीमराव पवार, रमाताई गायकवाड, पूजा कांबळे, सुरेखा शेजवळ इत्यादी उपस्थित होते.



















