निर्भिड पत्रकार
फलटण प्रतिनिधी, अनिल चव्हाण
दिनांक-१५/ ०६/२०१८
निबंळक ता. फलटण येथील तलाठी श्रींमत दिनकर रणदिवे यांना एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत खात्याने पकडले धक्कादायक बाब म्हणजे नोकरीत असताना दोन वेळा लाचलुचपत विभागाने पकडले असून फलटण ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत सविस्तर माहिती अशी कि महिलेने गावठान क्षेत्रात जागा खरेदी केली होती.या मुळे ही जागा नावावर करण्यासाठी ती महीला रणदिवे यांना वेळोवेळी नोंदीची मागणी करत होती मात्र रणदिवे त्या महिलेला पैशाची मागणी करत होते या मुळे महिलेने लाचलुचपत खात्यात तक्रार केली 15जुन रोजी दुपारी पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे व इतर अधिकार्यांनि सापळा रचुन एक हजार रुपयाची लाच घेताना ताब्यात घेतले फलटण ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असताना त्याचा निकाल लागला नसताना रणदिवे यांना पुन्हा लाचलुचपत खात्याने पकडले असुन सातारा जिल्हात हि पहिली घटला असून पहिला खटला निकाली निघण्या पुर्वी दूसर्या गुन्हात रणदिवे सापडलेची चर्चा सुरु आहे.



















