नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०५.२०२०
नाशिक – कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात सुरू असलेले लॉकडाऊन आणि गरिबांची होत असलेली अन्नपाण्याची उपासमार पाहता आपल्या मुलगा आयु. प्राक्तन च्या वाढदिवसाच्या खर्चातून शेकडो गरजूना जेवण उपलब्ध करून वाढदिवस साजरा करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. निर्भिड पत्रकार नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ साठी त्यांनी निधी दिला असल्याची माहिती मिळत आहे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे राबवल्या जात असलेल्या ‘एक घास भुकेला’ या उपक्रमासाठी त्यांनी
आर्थिक दान केलं आहे. असे विविध प्रकारे मदतीचे त्यांनी सहकार्य केले आहे. खरंतर अशा पद्धतीची ‘सामाजिकता’ हा एक उपजतच स्वभाव असतो. ही ‘सामाजिक जाण’ आणि ‘संवेदनशिलता’ या कुटूंबानी सुरुवातीपासूनच जोपासली आहे. आपले स्वतःचे शिक्षण गाव खेड्याकडे अत्यंत गरीबीत, हालाखीच्या परिस्थितीत झाले, याचे भान ते सातत्याने जपतात. त्यातूनच त्यांनी गेल्या आठ वर्षांपासून पेठे शाळेतील तीन हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च, शालेय फी, गणवेश, वह्या-पुस्तके, दप्तर, बुट रेनकोट आदी गोष्टी ते स्वतः वर्षाच्या सुरुवातीस देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी सोसायटीचा मिळणारा ‘डिव्हीडंट’ ते या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वापरतात. ते सांगतात की आम्हाला गरीबीच्या परिस्थितीमुळे शिक्षणात अनंत अडचणी आल्या या गरीब मुलांवर ही वेळ येवू नये म्हणून हा सर्व प्रयत्न चालू आहे. अशा या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचे विविध क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.



















