सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अजय उबाळे
दि.२२/१/१९
पाटण, तळमावले (ता. पाटण) येथील वाल्मिकी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिकणारी गुढे (ता.पाटण) येथील विद्यार्थिनी समृद्धी भरत कदम ही एसटी खाली सापडून जागीच ठार झाली.
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कराड- ढेबेवाडी रस्त्यावर गुढे फाट्यानजीक हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थ्यांनी तळमावले येथील खाजगी क्लासला शिकण्यासाठी निघाली होती. ती एसटीमध्ये चढताना हा अपघात झाला.ढेबेवाडीकडून कराकडे निघालेली कराड आगाराची बस पकडताना (क्रमांक एमएच१४ बी.टी. ३६६५) ती बसच्या पुढील चाकाखाली सापडून चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईंकांची गर्दी झाली होती. येथील पोलिसांना याबद्द्ल माहिती समजताच सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.



















