उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, वसीम सय्यद
दि.२.१२.१९
कळंब- शहरातील सर्व कब्रस्ताना मधे दिवा बत्तीची (स्ट्रीट लाईट) सोय करत अपायकारक झाडे-झुडपे काढुन स्वच्छता करत सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी मा.नगरसेवक शिवाजी कराळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. सविस्तर वृत्त, कळंब शहरातील एकाही कब्रस्तान मधे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे, एखाद्या मुस्लीम बांधव किंवा भगिनीची मयत झाल्यानंतर रात्री दफनविधी करत असताना, २१ व्या शतकाच्या आधुनिक युगात गॅस बत्तीच्या उजेडात दफनविधी करावा लागत आहे. तसेच सर्व कब्रस्तानामध्ये गवत व बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथे सर्प विंचु-काटा निघाल्याचे दफनविधी करून आलेले व कब्रस्तान शेजारील रहिवाशी सांगतात. काही युवकांनी कब्रस्तानची तक्रार मुख्यधिकारी यांना सांगितल्यावर हि बाब आमच्याकडे येत नाही, तुम्ही एम,एस,ई,बी.कडे जावा असे सांगितले. यामुळे मुस्लीम बांधवात रोष निर्माण होत आहे. प्रस्तुत कब्रस्तानाची पाहणी केल्यानंतर मुख्यधिकारी यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे कर्तव्य बजावत असताना हा केलेला दुजाभाव स्पष्टपणे जाणवत आहे. तसेच वारंवार सांगुनही याकडे दुर्लक्ष केल्याने मुख्यधिकारी यांच्या मनामध्ये मुस्लीम द्वेष तर नाही ना ? असाही प्रश्न निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना विचारण्यात अालेला अाहे. तात्काळ सर्व कब्रस्ताना मध्ये दिवा बत्ती, स्वच्छता व सुशोभिकरण करत मुख्यधिकारी यांचे निलबन नाही झाले तर दि.१६ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय कळंब यांच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी कराळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर तालेब बागवान, आबेद बागवान, माजिद शेख, रंजित चंदनशिवे, इम्रान काझी, करन गायके, बालु कुंभारपाशा सय्यद यांच्या स्वाक्षर्या आहेत.



















