सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२.६.२०२०
फलटण- कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस पाटील यांना कौतुकाची थाप दिली. कमिन्स फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत असताना पोलिस पाटलांची नेहमीच मदत होत असते. समाजासाठी हे कार्य करत असतानाच स्वत:चीही काळजी घ्यावी असे गौरवद्धार कमिन्स कंपनीचे श्री.प्रविण गायकवाड यांनी काढले. फलटण तालुका पोलिस पाटील संघटनेच्या सर्व पोलीस पाटलांना धरा ह्यूमन लाईफ रिज्युवेशन सोसायटी तरडगाव यांच्यावतीने आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले तर कमिन्स इंडिया फाॅउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटाईजर वाटप करण्यात आले. त्यावेळी कंमिन्स कंपनीचे पदाधिकारी प्रविण गायकवाड साहेब हजर होते. धरा ह्युमन लाईफ रिजुवेशन सोसायटीचे डायरेक्टर नितिन गायकवाड साहेब हजर होते. फलटण तालुक्यातील १२५ गावांसाठी जवळपास १०० पोलीस पाटील कार्यरत आहेत. अलिकडच्या काळात परगावाहुन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनास देणे, होम क्वारंटाईन बाबतची कार्यवाही करणे अशा प्रकारची कामे करण्यासाठी गावपातळीवर पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे या वेळी उपस्थितीत सातारा जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गाडवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर सातारा जिल्हा सल्लागार पोलीस पाटील संघटना सोमनाथ जगताप फलटण तालुका अध्यक्ष शांताराम कोळेकर फलटण तालुका उपाध्यक्ष नंदकुमार खताळ सुनील बोराटे आदी पोलीस पाटील उपस्थितीत होते.



















