सोलापुर,करमाळा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३१.१२.१९
करमाळा- तालुक्यातील (हिवरे) गावातील जयसिंह सुभाष ओहोळ हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथिल राज्यशास्त्र अधिविभागातील संशोधक जयसिंह सुभाष ओहोळ (MA. Ph. D in appearing, SET, NET) हे राज्यशास्त्र या विषयात नेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुका अध्यक्ष सुभाष ओहोळ यांचे ते सुपुत्र असुन या त्यांच्या यशाबद्दल करमाळा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.त्यांना प्रा. डाॅ. वासंती रासप,प्रा डाॅ रविंद्र भणगे,प्रा. डॉ.प्रकाश पवार प्रा. डॉ.पाटील मॅडम आदींचे मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या यशाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील,माजी सभापती शेखर गाडे, नागेशजी कांबळे, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.



















