सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२४,०१,२०२०
करमाळा- वंचित बहुजन आघाडी आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारत सरकारची आर्थिक दिवाळखोरीची धोरणे व NRC CAA कायद्याविरुद्ध सबंध महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदला करमाळा शहरात बाजारचा दिवस शुक्रवार असुनही चांगला प्रतिसाद मिळाला. यामधे समविचारी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष मा. हनुमंत शिवाजी मांढरे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्याचबरोबर करमाळा शहरातील मुस्लिम समाज मोठय़ा संख्येने सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुका वतीने केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत व्यापारी वर्गाने बंद पाळून सहकार्य केले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी करमाळा तालुका अध्यक्ष सुभाष ओहोळ, भीम आर्मीचे प.म.अध्यक्ष उतरेश्वर कांबळे, वंचित शहर अध्यक्ष विशाल लोंढे,देवा लोंढे,अनिल कांबळे,प्पू ओहोळ,ज्ञानदेव काकडे,शिवाजी भोसले,राजेंद्र (दादा) कांबळे,सायबा वाघमारे, युवा आघाडी लक्ष्मण (दादा) कांबळे,लखण कांबळे,चेतन कांबळे,निलेश कांबळे,विशाल जाधव,रंजीत कांबळे,बुध्दभुषण घोडके,आशिष अडसूळ,सुजित कांबळे,प्रणित कांबळे,रोहित कांबळे,अजय घोडके.इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















