निर्भिड पत्रकार
कराड प्रतिनिधी, सूरज जाधव
कराड नगरपरिषदेने कृष्णा नाका ते कोल्हापूर नाका रोडवरील हातगाड आज सकाळ पासुनच हटवण्याची मोहीम हाती घेतली, पण या मुळे हातगाडा व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या हातगाड्यांमुळे वाहतुकिस अडथळा निर्माण होत आहे. हे कारण समोर करुन नगरपरिषदेने कृष्णा नका ते कोल्हापूर नाका रोड लगतचे हातगाडे काढून टाकले. पण फक्त हात गाडेच रस्त्यालगत लागतात का? तसेच हातगाड्यांमुळे वाहतुकिस आडथळे निर्माण होतातका? तर रिक्षा आणि जीप यांच्यामुळे वाहतुकिस आडथळे निर्माण होत नाहि का? असा प्रश्न हातगाडा व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांच्या समोर प्रश्न उपस्थित केला. नगरपरिषदेने हातगाडे हटवण्यास सुरवात करताच शेकडो हातगाडे व्यावसायिक नगरपरिषदेच्या दारात ठिय्या मांडून बसले, यावेळी कराड चारचाकी हातगाडासंघटनेचे पदाधिकारी यांनी मुख्यधिकारी यांच्याशी चर्चा केली यावेळी नगरसेवक हणमंतराव पवार हि उपस्थित होते. परंतु या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही परंतु शुक्रवार दि.६ रोजी होणाऱ्या बैठकीत हातगाडा व्यावसायिकांच्या हिताचा निर्णय न झाल्यास कराड शहर हातगाडा संघटना तिव्र आंदोलन उभारणार असल्याचे कराड शहर हातगाडा संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निकम साहेब, कार्याध्यक्ष प्रमोद तोडकर, सचिव हरिभाऊ बल्लाळ, उपाध्यक्ष सतिश तावरे, संघटक आशपाक मुल्ला, खजिनदार गजानन कुंभार, अरिफ बागवान, आदी शेकडो हातगाडा व्यावसायिक उपस्थित होते.



















