उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
कळंब- नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी नगरसेविका इंदुमती हौसलमल यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. नगर पालिकेत विविध विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी दि.२५ जून २०२० ची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. सभा संपल्यानंतर उपनगराध्यक्ष संजय पांडुरंगजी मुंदडा यांनी उपाध्यक्ष पदाची रजा दिली. मुंदडा यांनी सदर रजा व्यक्तीगत कारणामुळे दिली असुन तब्बल ४५ दिवसाची म्हणजे १० ऑगस्ट पर्यंतची आहे.
महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ५६ पोट कलम २ नुसार रजे मुळे रिक्त जागी उपाध्यक्ष चा पदभार नगराध्यक्षा सौ. सुवर्णा सागर मुंडे यांनी जेष्ठ नगरसेवीका सौ. इंदुमती हौसलमल यांना पुढील पंधरा दिवस म्हणजे १० जुलै पर्यंत सोपवला आहे. त्यानंतर आवश्यकते नुसार अध्यक्ष निर्णय घेतील. नवनियुक्त उपाध्यक्षा सौ. इंदुमती हौसलमल यांचे सर्वस्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यामुळे आगामी काळात आणखीन राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात आणखीन काही नगरसेवकांना उपनगराध्यक्ष यांचा पदभार देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फिल्डिंग लावून असलेले श्रीधर भवर आणि लक्ष्मण कापसे यांचं काय? हे पुढील काळात समजेन.



















