निर्भिड पत्रकार,
चंद्रपुर प्रतिनिधि, प्रतिक नळे
माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार देण्याऱ्या भारतीय संविधानाचे संरक्षण करने प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असून, संविधान अपेक्षित समता,स्वतंत्र,बंधुता,न्याय भारतात प्रस्थापित करण्यासाठी कायदेविषय महिती असणे महत्वाचे आहे आणि ती महिती सर्व नागरिकास व्हावी या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती आणि तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर यांचे संयुक्त सहकार्याने मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाशिबिर आज आयोजित करण्यात आले होते .शिबिराचे अध्यक्ष गोरे साहेब यांनी कायदेविषयक माहिती संविधानातील कलमांसहीत माहिती सरळ आणि सोप्या भाषेत शिबिरार्थीस समजेल अशी माहिती दिली. या प्रसंगी प्रमुख वक्ते लिंगे सर तसेच गावचे सरपंच सुशीला मडावी ग्रामसेवक तेेलमासरे गावचे पोलिसपाटील मोर सर ,उमरे मॅडम पोलीस पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र कळमनाच्या डॉ.ब्रह्मपुरीकर मॅडम तसेच पंचायत समिती बल्लारपूरचे विकास अधिकारी दिकोंडावर मॅडम तसेच ग्रा.प. सदस्य रुपेश पोडे ,संदीप नळे ,सदस्या सुनीता नवारे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि कळमना ग्रामस्त उपस्थित होते.



















