सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१६.१२.१९
फलटण- न्यू फलटण शुगर दत्त इंडिया शुगर साखरवाडी कारखान्याच्या दूषित पाणी ओढ्यात जात असल्यामुळे ते ठिकाणचे पाणी पूर्ण दूषित झालेले आहे या मुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे माशांची जीवित हानी झालेली आहे, दूषित झालेल्या पाण्यामुळे पक्षी प्राणी यांच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष न करता योग्य ती कारखान्यावर कारवाई व्हावी हा कारखाना कित्येक दिवस बंद होता आणि या मुळे येथील नागरीकांना उपास मारीचे जिवन जगावे लागले. अशा परिस्थीती मध्ये येथील नागरीक या दुषीत पाण्यामुळे आजाराला सामोरे जात आहे तसेच या पाण्यामुळे ओढ्यातील पाणी दुषीत झाले आहे आणि या करणामुळे लोकांना पिण्यास असलेले सर्व बोरचे पाणी या गावातील दुषीत झालेले आहे. तर ऐकीकडे मासे मरण पावलेल्या अवस्थेते दिसत आहे. या कारखाण्याकडे उच्चस्थरीय अधिकारी लक्ष देतील का आणि येथील नागरिकांवर आलेले संकट थांबवतील का व साखरवाडी येथील ग्रांमस्थांना जे भयंकर असे आजार होत आहेत या आजारा मधून सुटका होईल का व या मुळे गावात डेंगु, थंडी ,ताप मलेरीया, असे आजार झाले आहेत या मुळे येथील नागरीक आजाराने त्रस्त झालेले पाहवयास मिळत आहे या कारखान्यावर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल का व प्रशासन जनतेला दूषित नसलेले पिण्यास योग्य पाणी कधी मिळणार असा प्रश्न साखरवाडी तील जनतेला पडला आहे.



















