सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०९.१९
सातारा- फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तालुक्याचे भाग्य निश्चित पणे उजळणार असून अपेक्षीत परिवर्तन होणार आहे. तालुक्यातील शेती, रोड, शिक्षण, अरोग्य, क्षेत्राचा खर्या अर्थाने विकास काम करण्याचे काम किरण शिंदे हे करू शकणार आहेत तालुक्यात मध्ये पाणी वेळेवर मिळाले तर तालुक्यातील शेतकरी भविष्यात जागतीक बाजारपेठेत तालुक्याचे नाव उंचावेल सर्व सामान्यांच्या व तरूणांच्या विचारांशी एकरूप होणारे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेउन त्या पटकन सोडवणारे व वेळप्रसंगी अडचणीच्या प्रंसगी मदतीला धावून येणारे मा. किरण शिंदे संपादक सच्चा समाजसेवक,उच्चशिक्षित, सुसंस्कृत,राज्यभर कार्यरत असणारे असून त्यांना उमेदवारी मिळावी या साठी मागणी केली किरण शिंदे समाजसेवक यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून तरूणांचा मोठा गट महाराष्ट्रभर निर्माण केला आहे त्यांनी कोरेगाव तालुक्या मधील २५गावे व फलटण तालुक्या मधील १२८ गावामध्ये त्यांनी तरुणांचा मोठा गट निर्माण करून गोरगोरीबांचे प्रश्न मार्गी लावले आहेत त्या मुळे त्यांनी फलटण कोरेगाव विधानसभे साठी उमेदवारी लढवावी असा आग्रह येथील तरूण वर्ग करत आहे,
सर्वसामान्यांच्या कामासाठी वेळ देणार्या व तरूणांमध्ये आदराचे स्थान निर्माण करणारा एक समाजसेवक,पत्रकार, सच्चा कार्यकर्ता किरण शिंदे यांच्या कडे तरूण वर्ग आकर्षित होत आहे,
तालुक्यातील मतदार व तरूणांनी त्यांनाप उमेदवारी द्यावी अशी मागणी वारंवार करत आहेत.त्यांना उमेदवारी मिळाल्यास मोठ्या मतधिक्याने विजयी करू असा विश्वास फलटण तालुक्यातील जनतेने व्यक्त केला आहे



















