नाशिक (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०५.२०२
◆ येवल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन परिस्थिती हाताळावी- पालकमंत्री छगन भुजबळ
येवला- शहारात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी येवला कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी येवल्याच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, निफाडच्या प्रांतअधिकारी डॉ.अर्चना पठारे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, निफाडचे बीडीओ डॉ.संदीप कराड, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



















