सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२६.०९.१९
◆ बेकायदेशीर कारवाईच्या
निषेधार्थ पाटण शंभर टक्के
बंद.
पाटण- देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ई.डी. चौकशी व गुन्ह्यात अडविण्याचा प्रयत्न हा बेकायदेशीर व निंदनीय आहे.याचा पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस कडून तिव्र निषेध करण्यात आला.याबाबतचे निवेदन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनाला दिले.दरम्यान या बेकायदेशीर कारवाईचा निषेध करण्यासाठी पाटण मधील व्यापारयांनी स्वयंस्फुर्तीने शंभर टक्के कडकडीत बंद ठेवून यात आपलाही सहभाग नोंदवला.राज्य सहकारी बँकेमध्ये ई.डी.कडून खा.शरद पवार यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. वास्तविक या बँकेत खा.शरद पवार हे साधे संचालकही नाहीत. परंतु सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांच्या सभांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद आणि तरूणांसह सर्वच क्षेत्रातून मिळत असलेली सहानुभूती यामुळे राज्यातीलच नव्हे तर अगदी देशातील शासनकर्त्यांचे धाबे दणाणले आहे.येणाऱ्या निवडणुकीत याच सहानुभूतीतून राज्यात परिवर्तन घडण्याच्या दाट शक्यता निर्माण झाल्या असल्याने शरद पवार नावाचे वादळ थांबविण्यासाठीच राज्यकर्त्यांकडून ई. डी. सारख्या संस्थाचा गैरवापर केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशाप्रकारे अनेक नेत्यांना अशा कारवायात अडकविण्यात आले आहे.यात केवळ सक्षम विरोधी पक्षनेत्यांनाच अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत एकाही सत्ताधारी नेत्यावर अनेक आरोप,गुन्हे असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही ही खेदाची व निषेधाची बाब आहे.आता तर या संस्थेने कहर केला आहे खा.शरद पवार यांचा कसलाही संबंध नसताना त्यांना अशाप्रकारे जाणीवपूर्वक व बेकायदेशीर पणे अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा कारवायांना ना शरद पवार घाबरत ना त्यांना मानणारे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील जनता या सुडबुद्धीने केलेल्या कारवाईला मतपेटीतून व परिवर्तनातून चोख उत्तर देईल.त्यामुळे अशा कारवायांचा आम्ही तिव्र निषेध करत असल्याचे मत यानिमित्ताने अनेक पदाधिकारयांनी बोलताना व्यक्त केले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरचिटणीस सुभाषराव पवार, महिलाध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेडगे, युवती अध्यक्षा सौ.रोहिणी पाटील, युवक अध्यक्ष गुरुनाथ शेडगे,जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव,पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड.अविनाश जानुगडे, दिपकसिंह पाटणकर,नगराध्यक्ष संजय चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खा.शरद पवार यांचेवर झालेल्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधाचे शासनाला निवेदन देताना पदाधिकारी व कार्यकर्ते.पाटणला स्वयंस्फुर्तीने शंभर टक्के बंद.खा.शरद पवार यांना माननारया पाटण मधील नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह व्यापारयांनीही या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ पाटण बंदला स्वयंस्फुर्तीने आपला पाठींबा दिला.या बेकायदेशीर कारवाईचा व्यापारी वर्गातूनही तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.तर बाजारपेठा शंभर टक्के बंद राहिल्याने नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीबाबतही व्यापारी संघटनांनी दिलगिरी व्यक्त केली.



















