चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.१८/०८/२०१८ ता.प्रतिनिधी )
चिमूर तालुका – गदगाव – कवठाळा – मार्गावर मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील अनेक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही झाले नसल्याने परिसरातील खड्डे मुक्त रस्त्यांचे ” अच्छे दिन” केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सद्या पावसाळाचे दिवस असल्याने रस्त्ये असद व खड्डेमुक्त असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .सदर रस्तावरील खडे बुजविण्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी प्रशांत डवले युवक कांगेस अध्यक्ष व परिसरातील युवा कार्यकर्त्यांनी सहायक उपअभियता सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर यांना दिनाक ०४/८/२०१८ च्या दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या खड्यामध्ये पाणी भरून वाहत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या अंगावर उडून त्यांचे रूपांतर भांडणात होणायची शक्यता आहे. शासनाच्या खड्डेमुक्त रस्त्यांना गद्गाव परिसरात अच्छे दिन येणे बाकी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
*लोकप्रतिनिधींचा समस्येवर कानाडोळाच ?*
या परिसरात कुठल्याच लोकप्रतिनिधींचा सद्यातरी थांगपत्ता नाही, परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गजर आहे. लोकप्रतिनिधींनी परिसरात येऊन येथील समस्या सोडवाव्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



















