सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०९.२०२३
फलटण- शहरातील गिरवी नाका परिसरात जातीवाचक शिवीगाळ करीत कोयत्याच्या मुठीने मारहाण करणार्या एकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार(दि.२०) सायं ६ वाजण्याच्या सुमारास गिरवी नाका परिसरात अनमोल नंदकुमार जगताप रा. विडणी ता. फलटण यांना जातीवाचक शिवीगाळ करीत फलटण येथील विक्रम विठ्ठल चोरमले याने सोबत आणलेल्या कोयत्याच्या मुठीने कपाळावर व डाव्या माडीवर मारहाण केली, याच कोयत्याने तुझी खांडोळी करून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणी मधे जगताप जख्मी झाले असून त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात विक्रम विठ्ठल चोरमले रा. हाडको कॅालनी, फलटण याच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरिक्षक पी. सी. दातीर करीत आहेत. दरम्यान, शहरातील गजबजलेल्या गिरवी नाका सारख्या वर्दळीच्या ठीकाणी चक्क कोयता काढून दहशत माजवीत जातीवाचक शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण केल्याने गिरवी नाका परिसरात दहशतीचे वातावरण झाले असून फलटण शहर पोलीसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.



















