सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,मनोज भोसले
दि.२६/१/१९
🌑 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
फलटण,गुणवरे येथील कै.संजय गांधी विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत मोठा आनंदोत्सव साजरा केला.भारतीय संस्कृतीचे जतन करत विद्यार्थ्यांनी लावणी,देशभक्तीपर,कोळीगीत अश्या विविध गीतांवर डान्स केला.तसेच गावकऱ्यांनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले दर्शकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. राहुल कणसे,भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमान विठ्ठल गौंड.श्री गावडे सर,श्री सांगळे सर,दीपक आढाव (सदस्य, ग्रा. गुणवरे), उदयसिंह साळवे,दत्तात्रय वाघमारे तसेच विद्यालयातील माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रणवरे पी.पी.यांनी केले.



















