चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
चिमूर- तालुक्यातील पळसगाव, गोंडमोहाळी या ठिकाणी आज क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. २ जानेवारी ला रात्रीला मनोहर मेश्राम व नरेश पाटील यांचा फुले भीम गीतांनी कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली व सावत्री च्या लेकीनी आपल्या फुले, भीम उत्कृष्ट गीतावर नृत्य सादर करण्यात आली. सकाळी ८ वाजता महात्मा जोतीबा फुले चौकातून मिरवणूक काढण्यात आली सदर मिरुणूक हि महात्मा फुले मंडळ, अखिल भारतीय बौद्ध समाज व माळी महासंघाच्या पळसगांव वतीने जयंती साजरी झाली. यावेळी विविध वैचारीक व प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन करुन सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले.
आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन मा लता पिसे सभापती चिमूर यांनी वेक्त केले,सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे आपल्या कीर्तनातून गुमणार कीर्तनकार साहेब अमरावती यांनी केले. मा,कार्यक्रमाचे अद्यक्ष मा वर्षा लोणारकर मॅडम,यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. शिक्षणाखेरीज मनुष्याचा विकास साधणार नाही असे सांगितले. मा.नर्मदा रामटेके,म्हणाल्या की फुले दाम्पत्यांनी जुन्या, चालीरित्या व रुढी परंपरांना मोडून काढण्याचे काम केले. समतेचा ज्वालामुखी ह्रदयात ठेवून कायम समाजसुधारणेचे कार्य केले. म्हणाल्या की जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला अधिक मजबुती देण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान बहाल करुन दिले. संविधानाने महिलांसह प्रत्येक नागरीकाला समान हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत. यावेळी यांनी म. जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाज शिक्षीत करण्याकरीता केलेल्या महान कार्याचे महत्व विषद केले. आपल्या मुखातून सावित्रीबाई फुले च्या ओवी अंकिता शेंडे यांनी मांडले त्याच प्रमाणे, अनामिक पाटील यांनी सुद्धा आपले मत वेक्त केले,
यावेळी लता पिसे पंचायत समिती सभापती चिमूर,गीता कारमेंगे पंचायत समिती सदस्य, नर्मदा रामटेके, वर्षा लोणारकर माजी पंचायत समिती सदस्य, नर्मदा रामटेके पंचायत समिती सदस्य, गीता शेंडे सरपंच ग्राम पंचायत पळसगांव, रागिना गूळधे पोलीस पाटील, सचिन बन्सोड, तंटा मुक्त समिती अद्यक्ष, सुरजगडे साहेब, दामोदर रामटेके अद्यक्ष अखिल भारतीय बौद्ध महासभा, प्रभाकर गजभिये, अखिल भारतीय बौद्ध महासभा सचिव, अशोक शेंडे, दांडेकर साहेब इत्यादी मान्यवर च्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला या वेळी महात्मा फुले मंडळच्या महिला सदस्य व उपासक माळी महासंघ यांची उपस्थिती होती. महिला अध्यक्षा बौ.पं.म.कमिटी मंडळ, भिम अनुयायी, धम्मबांधव उपस्थित होते. माळी महासंघचे पदाधिकारी सदर कार्यक्रम चे संचालन प्रदीप गजभिये, यांनी केले. सदर कार्यक्रमास मा.शंकर वाटगुरे, ज्ञानेश्वर गुरनुले, शंकर गावतुरे, लता चौधरी, गीता शेंडे, सीमा गुरनुले, विनोद भीमटे, संदीप गूळधे, डाॅ.कामडी, संदीप ढोक, विकास मोहूर्ले, भिषम्यचार्य राऊत, निलेश गजभिये, विनोद रामटके, श्रीकांत रामटेके इत्यादीनी अथक परिश्रम घेतले. रात्रौला आझाद संमिश्र मंडळ पळसगांव यांनी संगीत स्वप्न भंगले सूनबाईचे या नाट्य प्रयोग केले, असे विविध कार्यक्रम करण्यात आले



















