चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, योगेश शेंडे
दि.२३.०६.१९
◆ शांततेत पार पडले मतदान.
नागभीड- तालुक्यातील येनोली माल येथे ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. सध्या खरिप हंगाम असताना सुद्धा मतदारांनी जवळपास ८२.८४% मतदान केले आहे सध्या निवडणूक निकालाच्या चर्चा पानटपरीवर चर्चेला सुरवात झाली असून माझा उमेदवार निवडून येणार असल्याची चर्चा करीत सुटले आहे. या वर्षी सरपंच पद खुला प्रवर्ग असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.
२४ जून रोजी निवडणूक निकाल असून मतदाराचे निवडणूक निकाल कडे लक्ष लागले आहे. यनोली येथील एकूण मतदान १४६९ असून १२१७ मतदान झाले असून मतदान शांततेत पार पडले वार्ड नं.१ मधून ६०५ पैकी ५०२ वार्ड नं.२ मधून ३८१ पैकी ३३१ वार्ड नं.३ मधून ४७३ पैकी ३८४ मतदान झाले आहे विशेष म्हणजे, शेती कामे करून मतदान करावा लागत असल्याने उमेदवारांची व मतदाराचे मोठी पंचाईत झाली होती. निवडून येणाऱ्या उमेदवारला ग्राम पंचायतीच्या गावपुढाऱ्यांना सदर निवडणुकीचा निश्चितच फायदा होणार आहे.



















