चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश शेंडे
दि.२४.०६.१९
नागभीड- तालुक्यातील येनोली माल येथे ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक २३ जून रोजी पार पडली आहे.२४ जून रोजी तहसील कार्यालय नागभीड येथे मतमोजनी करण्यात आली असून निकाल हाती लागला आहे ग्राम विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार श्री.अमोलजी बावणकर हे मोठ्या मताधीक्याने विजयी झाले आहेत तसेच ग्राम विकास आघाडीचे ६ सदस्य पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
१) मंगेश मडावी
२) अर्चना मेश्राम
3) वर्षा सोनवाणे
४) संगीता घुगुस्कार
५) ज्योती मेश्राम
६) कल्पना दडमल
विजयी झालेले आहेत तसेच विरोधी आघाडीचे पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत
ग्राम पंचायत वर ग्राम विकास आघाडीचा वर्चस्व ठरले विधानसभेच्या निवडणुका समोर असतांना ग्राम पंचायत येनोली माल येथील पंचायत वर वारजूरकर समर्थतीत गटाचे सहा उमेदवार मोठया फरकाने निवडून आले आहेत.याचा निश्चितच समोर फायदा होणार आहे



















