चंद्रपुर(निर्भिड न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१४.०६.१९
चिमूर- भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्यालयाचे उदघाटन पिंपळनेरी रोडवरील डॉ फुलझेले यांचे घरी दि.१६ जून रोजी दुपारी १२ वा. आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशल मेश्राम, माजी राज्यमंत्री डॉ रमेशकुमार गजभिय, जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, माना आदिम जमातीचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद सांदेकर,जिल्हा संघटक कपुरदास दुपारे, प्रा.डॉ.अनमोल शेंडे, इंजि. गजेंद्र चाचरकर, जिल्हा महासचिव रमेश ढेंगरे, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ शेंडे, शालीक थुल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



















