चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधि, विकास खोब्रागडे
चिमूर,
दिनांक २०ऑक्टोबर २०१८ ला चिमूर पंचायत समिती येथील काही गावे प्रधानमंत्री आवास घरकुल योजने वंचित असून या कडे मात्र शासनाचे दुर्लक्ष असून फक्त सर्वाना घरे मिळतील ही फक्त हवेतील घोषणा करनण्यास ही सरकार पटाईत आहे,की काय अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंतर्गत पिंपळगाव, कन्हाळगाव ,रामदेगी, जामनी, पांजरेपार,सोनेगाव वन सदर ही गावे मा.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रपत्र “ब”मध्ये (auto generate list) मध्ये गावे समाविष्ट नाही .व प्रपत्र “ड” मध्ये पिंपळगाव, बोथली(वहानगाव ),जामनी,रामदेगी, online app मध्ये नाही तसेच पिंपळगाव व कन्हाळगाव ही गावे तब्बल चार वर्षांपासून मा.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वंचित आहेत ,सदर गावातील घरकुल पात्र लाभार्थ्यांचे online मध्ये गावे समाविष्ट करून तात्काळ प्रपत्र “ड” मध्ये नोंदणी करण्यात यावी अन्यथा युवक काँग्रेस विधानसभा चिमुरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले. निवेदन देताना युवक काँग्रेस विधानसभा चिमूर अध्यक्ष सौ.दिक्षाताई शैलेंद्र पाटील,युवक काँग्रेस विधानसभा चिमूर सचिव मंगेशभाऊ एम.घ्यार, युवक काँग्रेस विधानसभा संघटक राकेश साठोने ,युवक काँग्रेस विधानसभा चिमूर सदस्य शैलेंद्र व्ही.पाटील, श्री.विलास मोहिणकर यांची उपस्थिती होती.



















