चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१८/१/१९
🌑 पशुधन विकास कार्यलयातील कोंबडी पिलू वाटपात अनियमितता
पशुधन विस्तार अधिकारी बैतुले यांचा भोंगळ कारभार
🌑चौकशी करून कारवाई करण्याची उपसभापती शांताराम सेलवटकर यांची मागणी
चिमूर, सर्वांगीण विकास होऊन स्वयंरोजगार च्या माध्यमातून लाभार्थी यांना स्वबळावर रोजगार निर्माण व्हावे यासाठी ग्रामीण भागातील युवकांना पशु जिल्हा अंतर्गत निधी प.स. स्तरावर वाटप केल्या जात असून चिमूर पंचायत समिती च्या पशु विभाग कार्यलयातील लाभार्थ्यांना कोंबडे पिलू वाटप कामात अनियमितता असल्याचा आरोप पस उपसभापती शांताराम सेलवटकर यांनी केली असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.सविस्तर वृत्त असे की चिमूर पंचायत समितीच्या पशु वैधकीय चिकित्सालय च्या माध्यमातून जिल्हा पशुधन योजनेतून शंभर कोंबडी पिलू वाटप करण्याची योजना आहे रीतसर लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले परंतु लाभार्थ्यांना वाटप करण्यापूर्वी चिमूर पंचायत समितीच्या मासिक सभेत कोणताही ठराव न घेता परस्पर वाटप करण्यात आले.पशुधन विकास अधिकारी बैतुले यांनी कोणतीही मासिक सभेची परवानगी घेतली नव्हती त्यांनी गैरशिस्त व गैरवर्तन करून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप प.स. उपसभापती शांताराम सेलवटकर यांनी केली असून पशुधन विकास अधिकारी आपल्या मनमानी कारभाराणे मासिक सभेत गैरहजर राहत आहेत कोंबडी पिलू वाटप मध्ये आर्थिक चिरीमिरी घेऊन वाटप केल्याने अनियमितता झाली चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पस उप सभापती शांताराम सेलवटकर यांनी केली आहे.



















