सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, प्रियांका भोकरे
दि.३०/१२/१८
सातारा, जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक संकलन उपक्रम राबवणेत येत आहे. नव्या वर्षांची सुरुवात स्वच्छ सुंदर गावांनी करावयाची आहे. पाणी हवा व जमिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कचऱ्यामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिक दिसुन येत आहे. जकातवाडी मध्ये प्लॅस्टिक संकलन मोहीम राबवण्यात आली सकाळी ८ वाजता शारदाबाई पवार आश्रमशाळा जकातवाडी प्राथमिक शाळा जकातवाडीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये जकातवाडी ते बोगदा या परिसरातले प्लॅस्टिक संकलित करणेत आले. ही प्लॅस्टिक मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच चंद्रकांत सणस उपसरपंच हनुमंत भोसले ग्राप सदस्य शंकर दळवी विनायक मोहिते योगेश शिंदे आबा पार्टे संजय जगताप विजय पडवळ तुकाराम काकडे नारायण दळवी अक्षय सणस यांच्यासह दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक ढाणे सर कांबळे सर सुळे सर कदम सर माने काका तसेच जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बचाल सर इतर शिक्षक यांचेसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेस पंचायत समिती गटविकास अधिकारी अमिता गावडे जिल्हा परिषदेचे अजय राऊत राजेश भोसले अमित गायकवाड यांच्यासह ग्रामसेवक यशवंत धुमाळ उपस्थित होते. यावेळी शारदाबाई पवार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक निर्मूलनाचे पथनाट्य सादर केले.या मोहिमेत सहभागी झाले बद्दल जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



















