चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०३.२०२०
• प्रक्षुब्द बहुउद्देशीय संस्था पिपर्डा(पळसगांव) च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
चिमूर- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रक्षुब्द बहुउद्देशीय संस्था पिपर्डा (पळसगांव) च्या वतीने ८ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता “असा का जन्म माझा” या स्त्री कलावंत काजळसर येथील महिला नाट्य मंडळींच्या संचात पिपर्डा येथे नाट्य प्रयोगाचे आयोजन करन्यात आले आहे. सदर नाट्य प्रयोगाचे उद्घाटक, विनोद पाझरे सभापती जी.प चंद्रपूर,अद्यक्ष,सतीश वारजुरकर सदस्य जी.प चंद्रपूर, ठेमस्कर साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगांव, सुरेश आरकर पोलीस निरीक्षक चंद्रपूर, लता पिसे सभापती चिमूर पंचायत समिती, देवानंद पाटील पोलीस निरीक्षक भंडारा, प्रा.कुंदन दुपारे गडचिरोली, प्रा.गौरे सर, गडचिरोली, दुर्गा कोडपे सरपंच पिपर्डा भावना भावनकर, सविता चौधरी, नम्रता रामटेके इत्यादी मान्यवरांचे उपस्थित मध्ये स्त्री शक्तीचा गजर व जागर, सांस्कृतिक व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमामध्ये महिलांसाठी नाटिका, नृत्य आणि कायदे, आरोग्य, आहार, बेटी बचाओ, बेटी पढाओ व्याख्यान व जनजागृती व विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अद्यक्ष सचिव प्रक्षुब्द बहुउद्देशीय संस्था पिपर्डा(पळसगांव) यांनी केले आहे



















