बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०१.२०२२
आष्टी- घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना, अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीवर मात करत, शरीर संपदा कमवत, नागपूर कारागृह पोलीस भरतीत दुसर्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल. नुकताच दादेगांव ग्रामस्थांनी एकत्र येतं शाळेच्या प्रांगणात वाजत,गाजत मिरवणूक काढत, पेढे वाटून भूमिपूत्र विठ्ठल नामदेव महारनोर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मु.अ. कोंडेजकर सर होते. तर प्रमूख आतिथी म्हणून प्राचार्य डॉ.हरीदास विधाते सर यांनी मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी विठ्ठल महारनोर यांचा आदर्श घेऊन गुणवत्ते बरोबर शारिरीक दृष्ट्या बळकट होण्याकडे विशेष लक्ष देणे, ही पुढील काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले. विठ्ठलने आई वडीलांच्या कष्टाची जाण ठेवत, निर्व्यसनी राहिल्यामुळेच हे यश संपादन करु शकला. असे मत व्यक्त केले. तसेच विठ्ठल महारनोर यांस शालेय प्रवेश देणारे इ.पहिलीचे शिक्षक मोहन जगताप सर यांनी वडीलांनी ठेवलेले भिवा हे नाव बदलून विठ्ठल असे नामांतर केले. होते. तर प्रवेशावेळी विठ्ठल ‘भविष्यात फार मोठा होईल अशी भविष्यवानी केले होती. अन ती गरिबीवर मात,मिळवत विठ्ठलने जिद्दीवर जोरावर सत्यात उतरून दाखवली असे ऊद्गार मोहन जगताप यांनी बोलताना काढले. यावेळी कोल्हे सर, कर्डीले सर , नागरगोजे सर,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जि.प. सदस्यपती रामहारी महारनोर ,सरपंच अंकूश गीते,उपसरपंच बाळासाहेब बंडाले,सर्व माजी सरपंच ग्रा.पं सदस्य, मु.अ.नरुटे सर,विष्णूबाबा निंबाळकर, सुरेश गर्जे, अनिल कोकरे, वसंत बांदल, संदिप नागरगोजे,भूजंग विधाते, सचिन शिंदे, भरत विधाते, महादेव कोकरे सर, घुमरे सर,मूर्टेकर सर, औटी सर, तांदळे सर शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक युवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पवार सर यांनी प्रस्ताविक केले तर कोल्हे सर यांनी सुत्रसंचलन करत, आंधळे सर यांनी आभार मानले.



















