सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०१.२०२०
सातारा- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाई विभागीय विभागीय कार्यालय व सोनगिरवाडी (ता. वाई) शाखा स्वमालकीच्या नवीन इमारतीचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. शनिवारी (ता. १) रोजी सकाळी दहा वाजता सोनगिरवाडी (वाई) येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आहेत. कार्यक्रमास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन बँकेचे संचालक नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.



















