ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.०८.११.२०२२
भिवंडी- विश्वरत्न, महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी ०७ नोव्हेंबर या दिनी शाळेत प्रवेश घेतले, म्हणून हा दिवस देशात “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ,केंद्र कोशिंबी भिवंडी येथे मोठ्या उत्साहाने “विद्यार्थी दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरीत्रावर प्रकाश टाकून विद्यार्थ्याना प्रेरीत केले.
“विद्यार्थांनो जागृत व्हा” या विषयावर सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. विद्यार्थी दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहशिक्षक अशोक गायकवाड यांच्यातर्फे पेन व गुलाब पुष्प देऊन शिक्षणासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले. सहशिक्षिका दिलशाद शेख यांनी आभार व्यक्त करून समारोप केला.
यावेळी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.



















