सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२३
महाबळेश्वर- टॅक्सी युनियन,महाबळेश्वर या स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या संघटनेची सर्वसाधारण त्रैवार्षिक सभा कोरोना नंतर प्रथमच बॉनी व्युव बंगला येथे आज मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर (नाना) यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक सी डी बावळेकर (तात्या) व आजी माजी संचालक व सर्व सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी २०१९ पासूनचे जमा खर्च यांना माननीय सभेने मान्यता देऊन कायम केले. ऐनवेळच्या उपस्थित विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.तसेच संचालकांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने पुढील तीन वर्षांकरिता नविन संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी १५ संचालकांपैकी आठ नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. सर्व नवनियुक्त संचालक मंडळाचे किरण शिंदे यांनी अभिनंदन केले. सर्व सभासदांनी देखील सर्व नवनियुक्त संचालक मंडळाचे अभिनंदन केले…