चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१६.०६.१९
चंद्रपूर-देशभरामध्ये सर्वत्र डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहे. ह्यामुळे संपूर्ण देशात रुग्ण व डॉक्टर यांचे सलोख्याचे संबंध खराब झाले आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक रुग्णसेवेवर होत आहे. या सर्व चिंताजनक व्यवस्थेला जबाबदार असणार्या असामाजिक तत्वांचा जाहिर निषेध इंडियन मेडिकल असोसिएशन करित आहे. ह्या विरुद्ध सुरु असणार्या देशव्यापी आंदोलनाला आयएमए चंद्रपुरचा संपूर्ण पाठींबा आहे. देशातील सर्व हॉस्पिटलच्या डॉक्टरांना प्रभावशाली संरक्षणाचे कवच देणे, गुंडप्रवृत्तीच्या असामाजिक घटकांच्या विरोधात केंद्रीय कायदा भादंवि (Indian Penal Code )करणे व रुग्ण डॉक्टर यांच्यामध्ये सौदार्हाचे वातावरण निर्मिती करणे ह्या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपूर सह देशभरातील सर्व हॉस्पिटल व दवाखाने सोमवार दि. १७ जून १९ रोजी सकाळी ६ वाजेपासून २४ तासांसाठी बंद राहणार आहेत याची नोंद घेण्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जाहिर आवाहन करण्यात आले आहे.



















