सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.२७.०६.१९
पाटण- भारतीय बौध्द महासभा शाखा तारळे विभाग बौध्द विकास सेवा संस्था यांच्या वतीने राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी व तारळे विभातील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचा बँग,वही बंच व पेन तसेच प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थितीत
मीलींद कांबळे अध्यक्ष भारतीय बौ.म.सभा आबासाहेब भोळे, आनंदा गुजर, दगडू तांदळे,नितीन भोळे प्रास्ताविक एन.बी. गायकवाड यांनी केले.मनोगत विजय भंडारे सर,राजाराम भंडारे साहेब,आबासाहेब भोळेसर,मीलींद काबळेसर यांनी केले. सुत्रसंचालन गौतम माने सर यांनी केले.विभागातील प्रमुख भानुदास सावंत,राहुल रोकडे,शंकर भिसे,रामचंद्र गायकवाड, बाजीराव न्यायनीत,मधुकर जगधनी,भिमराव जगताप,आशोक जगधनी,वसंत सरगडे,राजु सावंत,विजय आ भंडारे,भिमराव सप्रे,दत्ता सावंत,मधुकर गायकवाड,निलेश सुनिल भंडारे,राम सप्रे,वसंत आडसुळे,बाबासो कांबळे,मनोज भंडारे,सोपान भिसे,भास्कर कांबळे,त्र्यबंक भंडारे,उत्तम सावंत,सतीश अडसुळे,जगन्नाथ भंडारे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.बी.गायकवाड यांचा सिंहाचा वाटा होता.तसेच सदर कार्यक्रमासाठी भीमराव जगताप कोंजवडे, राजाराम भंडारे साहेब ढोरोशी,मधुकर जगधनी तारळे,राहूल रोकडे राहुडे, गौतम माने साहेब कडवे,रामचंद्र गायकवाड साहेब कोंजवडे, निलेश सुनील भंडारे बांबवडे यांनी धम्मदान केले.राजेश जगधनी यांनी आभार मानले.या वेळी विभागातील विद्यार्थी पालक कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थीत होते.



















