निर्भिड पत्रकार
प्रतिनिधी : प्रशांत जाधव
दिनांक.११/०६/२०१८
शिरुर तालुका, खलापुरी येथील बाजार तळा जवळ असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या दरवज्याचे लोखंडी ग्रिल उचकटुन चोरटयानी बँकेत प्रवेश केला होता,स्ट्रांग रूम तोड़ून रक्कम लांबपास करायचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने तिजोरी न तुटल्याने त्यांच्या प्रयत्न असफल झाला. तिजोरीत १६ लाख ४१ हजार रुपये होते.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली,बँकेचे मैनेजर सी,व्ही,धसे यानी या प्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, खलापुरी येथे बाजार तळावर महाराष्ट्र ग्रामीण बँक ची शाखा आहे,शुक्रवारी सायंकाळी सहा च्या सुमारास कर्मचार्यानी कुलुप लावून बँक बंद केली,त्या नंतर रात्री चोरटयानी बँक च्या समोरिल सायरन बंद केला समोरचा दरवाजा व लोखंडी ग्रील चे कुलुप तोड़ून बँकेत प्रवेश केला,बँकेतील कँश जमा असलेल्या स्ट्रॉग रूम पर्यन्त ते पोहचले,गँस कटरचा वापर करुन त्यानी तिजोरी फोडन्याचा प्रयत्न केला, परंतु गँस कटर चा वापर करुन ही तिजोरी न तुटल्याने चोरटयाच्या मंसुब्यावर पानी फिरले गेले,या तिजोरीत १६लाख ४१ हजार रुपयाची रोकड़ शिल्लक असल्याची माहिती शाखाव्यवस्थापका कडुन देण्यात आली,बँकेतिल काही चोरी गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















