बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वि जयंती अगदी धूमधडाक्यात खालापूरी येथे साजरी झाली.गेल्या तीस वर्षापासून बंद पडलेल्या भीम जयंतीच्या प्रथेला भिमरत्न सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या पुढाकाराने नवजीवन मिळाले,बंद पडलेली भिम जयंती डॉ जितीनदादा वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली खालापूरी येथे संपन्न झाली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी तर कार्यक्रमाचे आध्यक्ष शेकाप चे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य भाई मोहन गुंड हे होते. यावेळी प्रमूख वक्ते मा.समीर पठाण हे होते.तसेच विचार पिठावर जयंती समितीचे अध्यक्ष मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर जिल्हा कोषाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ, एपीआय महारूद्र परजणे,गणेश घोलप,ब्रम्हराक्षे सर,येवले सर ,पो.कॉ.नामदेव लोंढे,शिरूर पोलिस स्टेशनचे पदाधिकारी, सरपंच किरण परजणे,उपसरपंच भोसले,मुरली ऊगले,सुधीर देशमुख,प्रा.परजणे सर,केण्डे सर,सोनवणे सर,माउली परजणे,परमेश्वर परजणे,सचिन परजणे,नारायण साधू परजणे, संभाजी परजणे होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीम जयंती समितीचे अध्यक्ष सम्राट डॉ जितीनदादा वंजारे यांनी केले ते बोलताना आमचे गाव सर्व धर्म सम भावनेने व्यापून गेलेले आहे आज संविधाना मुळे मी इथे जयंती साजरी करू शकतो.मी फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेबांमुळेच डॉक्टर बनू शकलो.माझ घर सुधारले ते फक्त बाबासाहेबांच्या अफाट उपकारानेच डॉ.बाबासाहेबांची शिकवण “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” ही मनात धरून मी मोठा झालो माझे समाज बांधव ही अशीच मोठी झाली पाहिजेत आणि त्यासाठीच आपल्याला महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायला पाहिजेत.आपण डॉ बाबासाहेब डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजेत असा मार्मिक सल्ला ही यावेळी डॉ जितीनदादा यांनी दिला.
यानंतर उपसरपंच भोसले साहेबांनी अगदी आभ्यासपूर्ण भाषण केल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिक्षण या शब्दाची व्याख्या त्यांनी सांगितली बाबासाहेबांचे अनंत उपकार ,त्यांनी घेतलेले अथक परिश्रम,मिळवलेल्या पदव्या याचाही यथोचित वर्णन भोसले साहेबांनी केले.यानंतर पो.कॉ.नामदेव लोंढे यांनी प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ दिशा आणि दशा यावर सखोल मार्गदर्शन केल तसेच आरक्षणावर मुद्देसूद मांडणी केली आणि आपल मनोगत आभ्यासपूर्ण मांडल.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी डॉ बाळासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करावी असा मार्मिक सल्ला दिला व खालापुरीत डॉ जितीनदादा वंजारे यांनी तीस वर्षापूर्वी बंद पडलेल्या भीम जयंतीला पुन्हा साजरी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व समाजात अशी तरुण तडफदार व्यक्तिमत्व तयार झाली पाहिजेत अशी आशा व्यक्त केली.शाहू फुले आंबेडकरी विचार तळागाळात पोहचले पाहिजेत आणि त्यामुळे गावातील सर्व धर्म सम भाव असायला हवा तो खालापुरी या आदर्श गावात आहे असेही ते म्हणाले.यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाई मोहन गुंड यांनी जयंती च्या शुभेच्छा दिल्या व सामाजिक सलोखा राखून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजा पुरते मर्यादित न ठेवता त्यांची जयंती सर्व समाजातून साजरी झाली पाहिजे असा सवाल यावेळी त्यांनी केला तसेच गणेश घोलप,किरण परजणे,क्रांती लोंढे आश्या अनेक माण्यवराची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले समीर पठाण यांनी डॉ बाबासाहेबांचे सर्व समाजावरील रुंन वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान सांगितले.यानंतर विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन व सजावट करून गावभर डीजे च्या तालात मिरवणूक काढण्यात आली सकाळी पंचशील ध्वजारोहन झाला व अगदी जल्लोषात आध्यक्ष डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगदी शांततेत जयंती उत्सव पार पडला.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी क्रांती लोंढे,शनी वंजारे,नितीन (फौजी)वंजारे,अंकुश वंजारे,श्रीकांत तूरूकमारे, चंदू तूरूकमारे ,पिण्टु वंजारे,अक्षय लोंढे,भागवत वंजारे,प्रवीण वंजारे,भगवान वंजारे,लहू वंजारे,सुंदर वंजारे,बाप्पू जोगदंड,भैय्या जोगदंड, नितीन लोंढे,अमोल वंजारे,नवले रोहित,पांडू गायकवाड,ओम वंजारे,अक्षय लोंढे,बापू लोंढे,मधुकर लोंढे,गणेश घोलप,आदींनी प्रयत्न केले.



















