सोलापुर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी.संतोष पवार
दि.१९.०६.१९
करमाळा- राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे करमाळा तालुका सोशल मीडीया उपाध्यक्ष नितीनभाऊ झिंजाडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की शासनाने १३ जुन २०१९ ला जे परीपत्रक काढले आहे .त्यानुसार महीनाभर रेशन दुकानातुन धान्य उपलब्ध करण्या संबधी सुचना आहेत.शासनाला परीपत्रक काढण्याची वेळ आली म्हणजे नक्कीच वेळेवर धान्य मिळत नाही.सध्या रेशनवर फक्त BPLशिधापत्रीका धारकांना अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत धान्य मिळत आहे.
सध्याची परिस्थीती ही १९७२च्या दुष्काळा पेक्षाही गंभीर आहे. शासनाने APL,BPL असा भेदभाव न करता सर्वच शिधापत्रक धारकांना मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध करुन द्यावे.जर कोनाला धान्य मिळत नसल्यास त्यांनी तहसीलदार व आमच्या कडे तक्रार करावी.किंवा ८३७८०९२६२५ या नंबरवर फोन करुन किंवा हाॅट्सअप करावी.लोकांवरील अन्याय राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष सहन करणार नाही.असे त्यांनी प्रसिध्दी स दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



















