मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, मिंलीद राऊत
दि.१६.११.२०२२
नवी मुंबई – ११ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई परिसरात महिलांसाठी सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे अग्रेसर संस्था धन लक्ष्मी महिला मंडळ यांच्या सौजन्याने २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्या अंतर्गत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या अंतर्गत नृत्य स्पर्धा व पैठणीचा लकी ड्रॉ यासारखे अनेक रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास महाराष्ट्र लावणी स्टार अश्विनी कामठे, दिपाली जोशी यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमातील धनलक्ष्मी महिला बर्थडे क्लब हा देखील उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील सेलिब्रिटी समाजसेविका डॉ. स्नेहा देशपांडे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईतील लोकप्रिय समाजसेविका उषा दत्त तसेच इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. उषा दत्त यांच्या हस्ते विजेते स्पर्धक महिला यांना पुरस्कार देण्यात आले.
अशाप्रकारे धनलक्ष्मी महिला मंडळ आयोजित २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वनिता राजे गडदे यांच्यामार्फत सदर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थतीमध्ये फिल्म डायरेक्टर मिलिंद एस.पी., मार्शल आर्ट रवी गिरी व कृष्णा यादव (प्राईम मेडिया न्यूज ट्वेंटी फोर संचालक) प्रतिक यादव ( संस्थापक अध्यक्ष परिवर्तन फाउंडेशन) होते.



















