सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०५.२०२०
महाबळेश्वर- कोरोना संकटाच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्व विशद होत असले तरी ते नेहमी शहरात स्वच्छता राखून आपले सर्वांचे आरोग्य सुरक्षित ठेवतात. महाबळेश्वर मध्ये गेल्या दोन वर्षी स्वच्छता अभियान खुप जोमाने राबविण्यात आले. हे सर्व स्वच्छता कर्मचारी या अभियानात पालिकेला पारितोषिक मिळावे म्हणून मनापासून झटले. दिवस रात्र आपले कर्तव्य अतिशय काटेकोरपणे पार पाडले. त्यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांना शारीरिक आजारपण देखील भोगावे लागले. अतिशय ताणतणावात असून देखील त्यांनी त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावले. सत्ताधाऱ्यांनी याच कर्मचाऱ्यांच्या कामावर स्वतःची पाठ थोपटून घेतली.आज कोरोनाच्या संकटाचा सामना करताना हेच कर्मचारी प्रत्यक्षपणे मैदानात उभे असून शहरवासीयांचे कवच बनले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना नगरपालिकेने मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचे चित्र आहे.त्यांना अनेक आवश्यक सोयीसुविधांसाठी रोजच झुंज द्यावी लागत आहे.हे कर्मचारी मनोभावे पालिकेची सेवा करताना दिसत असून अधिकारी वर्ग,सत्ताधारी मात्र वरच्या मलिद्यावर मोटारीवर मोटारी,माडीवर माडी बांधताना दिसत आहेत.परंतु या कर्मचाऱ्यांचे मात्र शोषण होताना दिसत आहे.
खालील व्हिडीओ आपणास विदारक वास्तवाची जाण करून देणारा आहे.निर्भीड पत्रकारच्या माध्यमातून स्वतः संपादक किरण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या परिस्थितीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.



















