पाटण: ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क-पांडूरंग लोहार ) पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता परिसरातील तेलेवाडी या वस्तीत बिबटयाचे दर्शन झाल्याने नाडे परिसरात भिंतींचे वातावरण आहे. तेलेवाडी येथे शुक्रवारी दि ६ रोजी सायंकाळी ७ वा.सुमारास अरूण चव्हाण तेलेवाडी याच्या घराशेजारी असलेल्या गोठयात जनावराची धडपड झाली.त्यामूळे अरूण चव्हाण व त्याचे कूटुंबीय घरातून बाहेर आले तर समोर एक भला मोठा बिबटया गोठयात जाण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून चव्हाण कूटुंबीयानी आरडा ओरडा सूरू केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाजाने बिबटयाने शेजारच्या शेतात धूम ठोकली नंतर ग्रामस्थानी गस्त घालून शोध घेतला पण बिबटया काही आढळला नाही. तेलेवाडी ही गजबजलेली लोकवस्ती असून शेजारी ऊसाची शेती व ओढा असलेने जनवराचे गोठे बाहेर आहेत. दुर्दैवाने बिबटयाने या वस्तीत लहान मूले अथवा माणसावर हल्ला केला असता तर मोठा अनार्थ घडला असता. या बिबटयाचे भितीने नाडे,तेलेवाडी,पांढरवाडी,नाडोली परिसरात भिंतींचे वातावरण असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली असता बिबटयाचे पायाचे ठसे आढळून आल्याचे सांगितले आहे.



















