सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,पांडुरंग लोहार
दि.१७\१\१९
नाडोली गावचे हद्दीत असणारी स्टोन क्रेशर कायम बंद करण्यासाठी आज सर्व नाडोली ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा अधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात गावाला होणारा त्रास बोअर, सूरूंग लावणे यामूळे नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचा बदललेल्या मार्ग यामुळे झालेली पाणी टंचाई जनावरांना मिळणारा चारा त्यावर साचलेली धुळ यामुळे जनावराचे आरोग्य धोक्यात आले आहे. खिळखिळी झालेली घरे अचानक अधुनमधून ढासळणारा डोंगर यामुळे त्रासलेली जनता यांनी आज अखेर जिल्हा अधिकारी सातारा यांना निवेदन देवून नाडोली गावाला या संकटातून मुक्त करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर केले. मा. जिल्हा अधिकारी यांनी ग्रामस्थाची मागणीचा विचार करून योग्य कारवाही केली जाईल असे आश्वासन नाडोली ग्रामस्थांना दिले.



















