सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.०१२.०१०.१९
फलटण- साखरवाडी ते मुरूम खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त या मथळ्याखाली दि.२४.०८.१९ रोजी निर्भिड पत्रकारने खराब रस्त्या बाबत बातमी देऊन आवाज उठविला होता.त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व आज साखरवाडी ते मुरूम चार किलोमीटर रस्ता या रस्त्याचे काम सुरू झाले.
साखरवाडी तालुका फलटण पश्चिम भागातील साखरवाडी ते मुरूम दरम्यानच्या चार किमी अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. पाईपलाईन साठी चाऱ्या काढलेल्या अर्धवट मुजवलेल्या होत्या. या खड्ड्यामधुन जाताना वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.सतत वर्दळीच्या या खराब ररस्त्याने जाताना अवजड व प्रवासी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काही काम रखडले होते. ही अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहन चालकामधुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. संबंधित अधिकारी वर्गाने याकडे पंधरा वर्षापासून लक्ष दिले नसल्याची तक्रार आल्यानंतर रस्ता करून देण्यासंबंधी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी साखरवाडी ते मुरूम रस्त्याचे काम सुरु झाले व ग्रामस्थांनी केली होती याची बातमी सर्वप्रथम निर्भिड पत्रकार या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम चालू केले आहे.रस्त्याचे काम चालु झाल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



















