सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.११.२०२०
सातारा- शिरवळ येथील स्टार सिटी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत निर्भीड पत्रकार या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या विभागीय कार्यालयाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संपादक किरण गोरखनाथ शिंदे यांच्या हस्ते रिबीन कापुन कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या सोहळ्यास वृत्तपत्र निर्भीड पत्रकारचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वृत्तपत्र निर्भिड पत्रकारच्या कार्याची थोडक्यात माहिती त्यांनी यावेळी दिली. तर नंदकुमार जोगदंड यांनी वृत्तपत्राच्या भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले.जिल्हा प्रतिनिधी प्रियांका भोकरे, सुभाष जाधव, अनिल माने यांनी उपस्थितांना पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास सातारा जिल्हा प्रतिनिधी सुभाष जाधव, प्रियांका भोकरे, अनिल माने, सातारा शहर प्रतिनिधी शंकर जमदाडे, खंडाळ तालुका प्रतिनिधी सविता देवडे, फलटण तालुका प्रतिनिधी धीरज जगताप, पाटण तालुका प्रतिनिधी चंद्रकात सुतार, महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी सुमित कांबळे, करमाळा तालुका प्रतिनिधी संतोष पवार, मावळ तालुका प्रतिनिधी अनिकेत जगताप, ओंकार भोकरे, पुष्पा जमदाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सौ.गीतांजली ननावरे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.



















