निर्भीड पत्रकार वृत्तपत्र संपादक श्री. नंदकुमार जोगदंड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. २०.०७.२०२६
पिंपरी – निर्भीड पत्रकार वृत्तपत्राचे संचालक, मुख्य संपादक श्री. नंदकुमार जोगदंड यांचा वाढदिवस निर्भीड पत्रकार काळेवाडी कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्य संपादक जोगदंड यांना पुष्पगुच्छ व महापुरुषांच्या प्रतिमा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थितांच्या समावेत वाढदिवसाचा केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकताही देवम्मा ददली मॅडम, उद्धव कुंभार सर, शशिकांत माने सर, जितेंद्र तायडे सर आणि विशाल शिंदे सर यांनी शुभेच्छा देत सहकार्य केले.
यावेळी उपसंपादक गौतम सुरडकर सर, मयूर चव्हाण, स्वप्नील इंगळे, आनंद मोरे सर, अजय खलसे, योगेश थोरात, चंद्रमणी जोगदंड, संबोध जोगदंड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी योगेश थोरात व अजय खलसे यांना निर्भीड पत्रकार नियुक्तीपत्र प्रदान करून पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी मुख्य संपादक मा. श्री. नंदकुमार जोगदंड यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निर्भीड पत्रकारितेच्या कार्यात अधिकाधिक यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
या वेळी जोगदंड यांनी सर्व सहकारी, प्रतिनिधी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक व्यक्त केले.



















