पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०८.२०२१
पुणे- पतीत पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी व परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या सन्मानार्थ भिम छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलमताई शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी, कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ३० जुलै २०२१ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या विरोधात पतितपावन संघटनेने ” दलित डीसीपी महिलेचा करायचं काय “! अशा जातीवाचक घोषणा देऊन समस्त दलित समाजातील महिलांचा अवमान केला व दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पतितपावन संघटनेने केला.

याचा निषेध करण्यासाठी व पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांना जातीदेषातुन बिर्याणी प्रकरणातून नाहक बदनाम करण्याचा पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कुटील डाव असुन, पोलिस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी. अशी मागणी या धरणे आंदोलनात करण्यात आली, तसेच पुणे शहरात प्रशासनातील जातीवाद आंबेडकरी समाज कदापी सहन करणार नसून यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शासनाला देण्यात आला. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे या केवळ दलित असल्याने येथील मनुवाद्यांचा पोटसुळ उठला असुन, पुणे शहरात आम्ही कदापी असे कॄत्य खपून घेणार नाही असे सर्व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळानी पुणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

व जातीवादी घोषणा देणाऱ्या पतित-पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत डॉ. प्रियंका नारनवरे यांची बदनामी करणाऱ्या पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकारी यांची नार्को टेस्ट करून खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.
या आंदोलनात भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड, उपाध्यक्ष निलेश गायकवाड, रिपाई युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेश चव्हाण, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष अॕड.विवेक भाई चव्हाण, दलित पॅंथरचे कार्याध्यक्ष यशवंत नडगम, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यअध्यक्ष निलेश अल्लाट, रिपब्लिकन मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे, दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश साळवे, पुणे फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्ष अॕड. वैशालीताई चांदणे, रिपाई महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, भीम आर्मी एकता मिशनच्या अध्यक्षा निताताई आडसुळ यांच्यासह पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. पतीत पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल न केल्यास यापुढे संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.



















