सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.२७.०६.१९
पाटण- विद्यार्थी मित्रांनो आपल्या भावी जीवनाला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी / विद्यार्थींनी सामजिक संघटनेच्या माध्यमातून रायझोनी इन्स्टिट्यूट ग्रुप ऑफ पुणे यांच्या विद्यमानाने स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे या विषयाला अनुसरून आपणास मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा.आपणास पास झाल्यावर कोण कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायला पाहिजे याबाबत यथायोग्य मार्गदर्शन करण्याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हावशी(पाटण) येथे दिनांक ३०/०६/२०१९ रोजी दुपारी १२ ते ३ यावेळेस विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा आयोजीत केला असून या मेळाव्यास बहुसंख्य विद्यार्थी मित्रांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉ.महादेव कदम सर रायझोनी इन्स्टिट्यूट ग्रुप ऑफ पुणे व प्राध्यापक अशोक कोकणे सर रायसोनि इन्स्टिट्यूट ग्रुप ऑफ पुणे यांचे मौलिक मार्गदर्शन आपणास होणार असून या मार्गदर्शन मेळाव्यास येताना आपल्या सोबत शक्य झाल्यास कुटुंबातील जबाबदार व्यक्ती किंवा पालकांना घेऊन उपस्थित राहण्याची विनंती महाराष्ट्र राज्य युवा विद्यार्थी/विद्यार्थींनी सामजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.



















